

महाराष्ट्र शासनातर्फे ' महात्मा गाधी तंटामुक्त अभियान' सरुवात झाली त्यासाठी तंटामुक्त संघटना किर्लोस गावासाठी श्री. अर्जुन (बाळा) लाड यांची
निवडक करण्यात आली. दिनांक 19 जुलै 2007 रोजी किर्लोस गावामध्ये या मोहीमेला सुरुवात झाली. श्री. अर्जुन बाळा लाड यांनी यांनी
स्थानिक गावातील ज्येष्ठ नागरिकांना घेऊन ग्रामंपचायत तटामुक्त समितीमध्ये 28 सभासद यामध्ये सहभागी करुन घेतले यामध्ये प्रकाश भावे,
वामनराव चव्हाण, शशीकात भरवे, सुनिल घाडीगावंकर तसेच स्थानिक पत्रकार असे सभासद म्हणून नियुक्त करण्यात आले. अशा प्रकारे तंटामुक्त समितीचे
काम सुरु झाले. दर महिन्याच्या एका दिवशी गावातील पावणादेवीच्या मंदिरात मिटिंग होऊ लागल्या. असे चालू असताना गावातील तंटे सोडविण्याचे काम सुरु झाले.
19 जुलै 2007 ते 19 जुलै 2008 पर्यंत एकूण स्थानिक व दखल पात्र असे 27 तंटे श्री. बाळा लाड यांच्या समितीपुढे आले व त्यांनी ते सर्व सोडविण्यास यशही आले.
श्री. बाळा लाड यांच्या समितीला हे सर्व खर्चाने करत आहे. त्यासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारचे मानधन मिळत नाही आहे. हे कारणाचे खूप आनंद
वाटत आहे, कारण लोकांचे प्रश्न सुटता आहेत.
श्री. आर. आर. पाटील (उपमुख्यमंत्री) यांना हा उपक्रम सुरु केल्यामुळे जुन्या पिढीतील चावडी पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे श्री. बाळा लाड यांनी तटामुक्त
समितीसाठी नियुक्ती केल्याबद्दल श्री. आर. आर. पाटील यांची आभार मानले आहे.













