Sunday, April 5, 2009

कोकणातील इंडो इमू पालन शेतीस पूरक व्यवसाय...










कोकणातील निसर्गेसौदयाबरोबर आता स्वयं रोजगारासाठी नवीन संकल्पना योजना राबविल्या जात आहे. यांच कोकणातील इंडो इमू पालन हा शेतीस पूरक व्यवसाय म्हणून पाहिला जात आहे. इमू हा मुळचा आँस्ट्रोलियन पक्षी आहे. भारतामध्ये प्रथम 1996 पासून आंध्र प्रदेशात इमू पालन व्यवसायास सुरुवात झाली व त्या पाठोपाठ महाराष्ट्र, कर्नाटका, तामिळनाडू या राज्यात इमू पालनास सुरुवात झाली.

इमू हा पक्षी 30 ते 40 वर्षे जगतात व न उडणारा पक्षी वर्गामध्ये गणला जातो. यांचे वैशिष्टय म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती असणारा व सर्व प्रकारच्या वातावरणात टिकून रहाणारा पक्षी आहे. इमू हा 18 महिने पुर्ण झालेली पक्षी आँक्टोबर ते मार्च या कालावधीत माद्या अंडी घालतात. त्यांच्या अंड्याचे वजन 400 ग्रॅम ते 700 ग्रॅम पर्यंत असते.

इमू पालनासाठी एकास एकप्रमाणे 1 नर व 1 मादी याप्रमाणे 3 महिन्याची वाढ असलेली पिल्ले विकत घ्यावी लागतात. त्याची साधारण किंमत 18,000 रुपये असते. ज्यावेळी हि पिल्ले विकत घेतली जातात त्यावेळी त्याची लसीकरण प्रक्रिया पूर्ण झालेली असावी. 10 जोडीसाठी 100x50 फुट अशी जागा लागते. त्यात इमूचे खाद्य भिजू नये तसेच उन्हात सावली मिळावी म्हणून 10x30 फुट ची शेड करावी लागते.

इमू पक्षाचे खाद्य हे हिरव्या पालेभाज्या, कोबी बारीक चिरुन घातल्यास इमू चांगला प्रकारे खातो पोल्ट्री फीड तयार करणा-या कंपन्यासुद्धा इमू फिड बनवतात. त्यात सोयाबीन, मका, मिनरल्स असतात. हे फिड साधारण 10 ते 15 रु किलो पर्यंत मिळते. इमू हा वाढ झालेला पक्षी साधारणता दिवसाला 800 ते 900 ग्रॅम खाद्य लागते.

इंडो इमू पालनापासून मिळणारे उत्पन्न मध्ये पूर्ण वाढ झालेल्या इमू पक्षाचे 25 ते 30 किलो मांस मिळते ह्या मांसाला 250 ते 400 रुपये पर्यंत बाजारात मागणी आहे. इमू हा सुरुवातीला 18 ते 24 महिन्यांच्या कालावधीत 10 ते 15 अंडी देतो व 24 महिन्यानंतर 20 ते 40 अंडी देतो ह्यात 1 अंड्याची किमंत 1200 रुपये प्रमाणे बाजारात मागणी आहे. इमू या पक्षापासून 3 ते 5 लिटर तेल मिळते. ह्या तेलाला प्रति लिटर 3000 रुपये भाव आहे या तेलाचा उपयोग त्वचा रोग, सांधेदुखी, एक्झीमा ह्या रोगांवर हे तेल उपयुक्त आहे.

कोकणातील देवगड तालुक्यात मशवी-गादववाडी रोड, मशवी, पोयरे येथे अमरे इम्यू पार्कची सुरुवात श्री. प्रदिप अमरे यांनी केली असून त्यांना तेथे मोठ्याप्रमाणात उत्पादन मिळत आहे असे असे श्री अमरे सांगतात. अधिक माहितीसाठी आपण प्रदिप अमरे – 9930310047 संपर्क साधू शकता.

इमू पालनाविषयीचे प्रशिक्षण व फार्म विषयी अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रो. प्रा. श्री. अजित गाडगीळ - 9820163529 , ऑफीस : ए/१०२, नवऋतुजा सोसायटी, जयहिंद कॉलनी, गुप्ते रोड. डोंबिवली (प.) दूरध्वनी : (0251) 2408196 भ्रमणध्वनी : 9820163529 Website : yeshwantemufarm.com

विश्वनाथ खांदारे
सदस्य – मुंबई मराठी पत्रकार संघ
संपर्क - 9987642793