Friday, July 18, 2008

किर्लोस-आंबवणेवाडी गाव गुगल map मध्ये कसा दिसतो..





1. मालवण तालुक्यातील किर्लोस -आंबवणेवाडी गाव..
२. गावातील पावणादेवीचे मंदिर
३. गावात जाण्यासाठी बाधलेला साकाव..
४. गुगल वर कसे दिसते किर्लोस आंबवणेवाडी गाव..

किर्लोस आंबवणेवाडी गणेशोत्सव 2007 क्षणचित्रे...



किर्लोस आंबवणेवाडी गणेशोत्सवातील विसर्जनाचे वेळी बापाचा निरोप घेताना हे क्षणिचत्रे..

Monday, July 14, 2008

आवाहन...

सप्रेम नमस्कार
'किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळ' ही आपली संस्था गेली कित्येक वर्षे कोकणातील आपले गाव आणि परिसराच्या उत्कर्षासाठी सतत कार्यरत आहे, ते आपणास माहितच आहे. आपल्या परिसराच्या आणि आपल्या माणसांच्या विकासासाठी आणखी एक नियोजनबध्द पाऊल संस्था उचलू इच्छिते. त्यासाठी आपले सक्रिय सहकार्य मिळावे यासाठी हे आवाहन करीत आहोत.
आपणास माहिती असेल आपल्या मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरु आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नोव्हेंबरमध्ये एक छापिल स्मरणिका प्रकाशित करण्याचा मंडळाचा मानस आहे. स्मरणिका म्हटली की त्यासाठी जाहिराती हव्यात हे ओघानं आलच. आपला हातभार त्यासाठी लागावा अशी विनंती आहे.
रौप्य महोत्सवी वर्षाच्या स्मरणिकेतील ठळक वैशिष्टयs
• पावणादेवी व रामेश्वर मंदिराचा इतिहास व छायाचित्रे
• किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळाची स्थापना व इतिहास
• मंडळाचे आजीव व माजी सदस्याचे परिचय व छायाचित्रे
• किर्लोस आंबवणेवाडी गावातील जेष्ठ व्यक्तीच्या मुलाखती व छायाचित्रे
• किर्लोस आंबवणेवाडीची वाटचाल टप्पा टप्याने...
• किर्लोस आंबवणेवाडीतील पाणीयोजना, शाळेची इमारत, स्वस्त दरात धान्य वाटप, साकाव बांधणी, अशा कामाची माहिती व छायाचित्रे
• कोकणाचे पालक व महसूलमंत्री मा.नारायण राणे यांचे किर्लोस - आंबवणेवाडी गावाबदलचे मत..
• किर्लोस आंबवणेवाडी मागील सरपंच तलाठी यांची मुलाखत
• किर्लोस आंबवणेवाडीचे आमदार डॉ. ऍड अजित पांडुरंग गोगटे यांची मुलाखत..
• महाराष्ट्र शासनातर्फे 'तंटामुक्त अभियान' गावातील प्रमुख अर्जुन (बाळा) लाड यांची मुलाखत
• किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळाने घेतलेले सांस्कृतिक कार्यक्रम, दसरा समेलन, तीर्थयात्रा यांची छायाचित्रे व थोडक्यात माहिती..
• किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळाचे अध्यक्ष व सेक्रेटरी यांची मनोगत..
• किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळाची कार्यकारी मंडळ सन 2007-2008
• कणकवलीतील महत्त्वाचे नंबर व पत्ते
वरील पैकी कोणत्याही प्रकारचे साहित्य आपणाकडे असल्यास किंवा मुलाखत व माहिती लिहिण्यास तयार असाल तर कृपया 15 ऑंगस्ट 2008 पर्यंत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे आवर्जून पाठवा व काही सुचना असल्यास तेही कळवावे. त्यामुळे स्मरणिकेचा दर्जा अधिक उत्तम होण्यास मदत होईल.
थोडक्यात, ह्या स्मरणिकेसाठी उपयुक्त साहित्य आणि जाहिरात असे दोन्ही प्रकारचे योगदान मंडळाला म्हणजेच पर्यायाने आपल्या किर्लोस आंबवणेवाडीच्या लाल मातीसाठी हवे आहे. आपल्या प्रिय ग्रामभूमीच्या विकासासाठीचा हा यज्ञ सर्वांचा आहे. आपली ग्रामदेवता पावणादेवीच्या कृपेने आणि आपल्या सहकार्याने आपले हे सारे मनसुबे यशस्वी होतील असा विश्वास वाटतो. सर्वांचा हातभार त्यास लागावा हीच आई पावणादेवी आणि रामेश्वराच्या चरणी प्रार्थना.
धन्यवाद.
आपले,
रामचंद्र लाड ( अध्यक्ष : किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळ )
रामचंद्र लाड - 9820359153 - विश्वनाथ - 9987642793 विजय लाड - 9820227661

Friday, July 11, 2008

किर्लोस आंबवणेवाडी गावाची वाटचाल..



स्थापना : 1983
किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळ (मुंबई)
(रजि.नं.16383 जी.बी.बी.एस.डी)
एफ 8242 मुंबई
कार्यालय -'श्रमिक' 2रा माला खो.नं.219
साने गुरूजी मार्ग मुंबई नं. 12


स.न.वि.वि.
आपणास कळविण्यास आनंद होत आहे की 'किर्लोस आबवणेवाडी सेवा मंडळ' हे अत्यंत कठिण परिस्थितीतून स्थापन करण्यात आलेले सेवा मंडळ आहे. गावातील आणि मुंबईतील ग्रामस्थांच्या सहकार्याने मंडळाने आजपर्यंत हाताळलेली सर्व कामे यथाशक्ती आपल्या मंडळाला सहकार्य देवून भविष्यात जी जी कामे येणार ती पूर्ण करण्यास सहकार्य करावे. आपल्या गावात जी जास्त शिक्षित तरूण मंडळी आहेत त्यांनी पुढे येवून मातृभूमिकरिता किंबहूना मातृभूमितील गरीब, गरजू, अशिक्षित लहान थोर मंडळीना मंडळाचे सभासद होऊन मार्गदर्शन करावे हि विनंती आहे.मंडळाच्या स्थापनेपासून आज तारिखपर्यंत थोडक्यात कामाचा आढावा खाली देत आहोत.
मंडळाची स्थापना :
इ.स.1983 साली आंबवणेवाडीतील इयत्ता 6वी पर्यंतच्या वर्गाची शासनाच्या आदेशावरून उठविण्याची जी कारवाई होत होती त्या वादग्रस्त प्रश्नावरून सर्व ग्रामस्थ एकत्रित येवून मंडळाची स्थापना केली त्यानंतर आंबवणेवाडीतील शाळा आंबवणेवाडीतच रहावी या बद्दल मंडळाने संबंधीत अधिकाऱ्याशी संबंध साधून प्रयत्न केले व शाळा आंबणेवाडीतच स्थिर केली. आज तीच शाळा इयत्ता 7वी पर्यंत उपलब्ध आहे. शाळेतील इ. 1ली ते 7 वी पर्यंतच्या पहिल्या 3 क्रमांकाच्या मुलाना दरवर्षी येणाऱ्या 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिनी) मंडळातर्फे बक्षिस देऊन त्यांचा गौरव केला जातो.
रस्ता :
आपल्या गावात या पूर्वी साधी पायवाट उपलब्ध होती मंडळाने या बाबतीत प्रयत्न करून ग्रामस्थांच्या मदतीने एस.टी गाडी येईल असा रस्ता पूर्ण केला आणि 4 ते 5 वर्षे एप्रिल मे मध्ये कणकवली पिसे कामते मार्गे किर्लोस गाडी सुरू केली सरकारच्या काही धोरणामुळे ती गाडी सध्या बंद आहे पण कणकवली असरोंडी मार्गे किर्लोस गाडी सुरू आहे.
आज गावात आजारी पडलेल्या व्यक्तिला सहजतेने गाजीत बसून कणकवली किंवा मुबईला जाता येते. दि. 10.6.98 ला ग्रामपंचायतीला पत्रक आणि मा. माजी पालक मंत्री श्री नारायणराव राणे यांना 161198 त्या पत्रकानुसार श्री पावणादेवी मंदीर पर्यंत रस्त्याला डांबरीकरण करण्यात आले म्हणूनच आज मारुती व सुमो त्या रस्त्यावर दिसत आहेत.
सातरल:कासरल मार्गे कणकवलीला जाण्याकरिता आणि आंबणेवाडी ते मालवणला जाण्याकरिता एस.टी गाडीची सोय व्हावी अशी 10698 पासूनची आमची मागणी आहे. या संदर्भात मा. आमदार श्री आंप्पा साहेब गोगटे आणि माजी मुख्यमंत्री मा. आमदार श्री. नारायणराव राणे यांना वारंवार पत्र व्यवहार सुरू आहेत. 201098 ला सातरल:कासरल सरपंच यांना पत्र व्यवहार केलेला आहे प्रयत्न सुरू आहेत.
शाळाबालवाडी :-
गावीतील लहान मुलांची (शिशू वर्गाची) शिक्षणाची सोय व्हावी या करिता मंडळाने स्वत: प्रयत्न करून मंडळाच्या इमारती मध्ये जागा उपलब्ध करून मंडळाच्या वतीने कु. छाया गणपत लाड. कु.शालिनी कृष्णा लाड या मुलींना मानधन देवून शिशू वर्ग सुरू केले. खाऊची सोय श्री अर्जुन (बाळा) लाड हे करीत होते. कालांतराने बालवाडीचे रुपांतर सरकार तर्फे अगंणावाडी मध्ये झाले त्याकरिता सुध्दा एस.एस.सी. पास शिक्षिका हवी होती ते शोधण्याचे काम सुध्दा मंडळाच्या कार्यकर्त्यानी केले. आणि सौ. रूपा रमेश महाडीक यांची नियुक्ती केली. गं.भा. सरस्वती स. खांदारे यांची सुध्दा नियुक्ती केली आणि आज दोन व्यक्तिचा त्यावर उदरनिर्वाह चालू आहे.
शाळेच्या जुन्या इमारतीच्या दोन्ही बाजूला वाढीव इमारत सरकार दरबारी प्रयत्न करून वाढवून घेतली. इमारती मध्ये मंडळाच्या खर्चातून लाईट फीटींग मीटर बसवून घेण्यात आले त्याला लागणारी वायर कै.दशरथ विष्णू लाड यांनी उपलब्ध करून दिली ग्रामस्थांनी वर्गणीच्या माध्यमातून शाळेला कुंपण घालण्याचे काम सुरू आहे जुन्या इमारतीमध्ये फळयांचे पार्टीशन करण्यास मंडळाने भाग पाडले.
दि. 24698 रोजी शाळेतील मुख्याध्यापकांचे शाळेमध्ये सरकार तर्फे वाढविस्तार योजना राबविण्याकरिता 10 हजार रुपये जमा करण्याचे पत्र मंडळाच्या नेवे आले. त्यापासून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून 5301 पर्यंत जवळ जवळ 15 हजार रुपये सामान आलेले आहे.
इमारत :
· मंडळाच्या स्थापनेनंतर आपल्या गावात मंडळाची इमारत असावी या साठी मंडळाने सभासदांकडून निधी गोळा करून ग्रामस्थांनी श्रमदान करून आज मंडळाची इमारत गावात उपलब्ध करू ठेवली आहे. इमारतीसाठी लागणारी जमीन श्री सिताराम बुधाजी महाडीक यांनी उपलब्ध करून देवून मंडळाला बहुमोलाचो सहकार्य केले आहे. आज त्याच इमारतीमध्ये श्री पावणादेवी सहकारी सोसायटीचे किराणा मालाचे दुकान कार्यरत आहे. तसेच रॉकेलचा परवाना मंडळाने मिळविलेला आहे याचा फायदा ग्रामस्थांना होत आहे.
पाणीपुरवाठा :
पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत गाव तळी बांधणे व नवीन विहीरी बांधणे ही कामे थोडया फार प्रमाणात प्रगती पथावर आहेत.
गावतळीला नळ योजना व्हावी म्हणून मा. आमदार श्री. आप्पा साहेब गोगटे आणि माननीय श्री. नारायणराव राणे यांना निवेदने देऊन आज गावाला तळी बांधून मिळाली त्याच तळीला आज नळ योजना झालेली आहे त्याकरिता सरकारी दरबारी अनेक प्रयत्न करावे लागले. वेळ प्रसंगी मंजूरी कमी असल्याने मंडळाने शिवाजी मंदिर आणि रविंद्र नाटय मंदिर येथे मदतीकरिता नाटकांचे प्रयोग केले आणि निधी उपलब्ध केला. नळ योजना व्हावी म्हणून श्री. गणेश संभाजी लाड यांनी पंप आणि पाईप बक्षिस रूपाने दिले काही ग्रामस्थांनी देणगी देवून हातभार लावला ग्रामस्थांनी श्रमदान केले 20501 रोजी नळाद्वारे ग्रामस्थांना पाणी मिळावयास लागले.
इतर कामे :
दि. 15-6-98 च्या मंडळाच्या पत्राप्रमाणे गोठणे गावच्या सरपंचानी साकवाच्या बाजूला असलेल्या वहाळीला पक्का साकव करुन दिला त्याचे श्रेय कै.सरपंच रामचंद्र बाईत यांना जाते. गडनदींला बाधण्यात आलेल्या साकवापासून आंबवणेवाडी पर्यंत 3 फूटाची पाऊलवाट सरपंचांना पाठविलेल्या पत्रावरून त्यांनी ती वाट पूर्ण केली.
स्मशान भूमिकडे जाण्यासाठी पक्का रस्ता व्हावा. स्मशान भूमिमध्ये शेड, मयत व्यक्तिला जाळण्यात येणारी लाकडे, सरळ राहण्यासाठी लोखंडी खांब, रस्त्यावर लाईटची सोय, गोठणे माळावर धरण या मागण्या 1985 पासूनच्या आहेत. त्यातील काही कामे पूर्ण झालेली आहेत. राहिलेली कामे ग्रामपंचायतीच्या विचारधीन आहेत.
नदीपलीकडे पावसाळी जाणे गैरसोयीचे होते म्हणून वारंवार प्रयत्न करून मा. आमदार श्री. आप्पा साहेब गोगटे यांनी गडनदीला पक्का साकव बांधून दिला. बांधल्यानंतर बरेच अडथळे आले त्याकरिता वेळोवेळी मंडळाने संबंधीत खात्याशी संपर्क साधून ते अडथळे दूर केले. आता त्या साकवाला रंग लावण्यात या हि मागणी केलेली आहे. साकव झाल्याकारणाने लोकांना, तुम्हा, आम्हाला, ग्रामस्थांना सहजतेने पावसाळी नदीपलीकडे जाता येते.
हे मंडळ स्थापन होण्याकरिता खालील व्यक्तिचे मोलाचे सहकार्य लाभले. कै. शांताराम म. आंगणे, कै. रावजी गो. महाडीक, कै. दत्ताराम भी. महाडीक, कै.गोपाळ गो. लाड, श्री. नारायण बा. लाड, ब्रम्हाजी ल. लाड, अनंत रा. लाड, दत्ताराम ल. लाड, विठ्ठल सि. खांदारे, पुरुषोत्तम गो. लाड, रामचंद्र आ. लाड, दिपक ज. लाड, केशव स. चव्हाण, भास्कर स. वाघरे, चंद्रकांत वा लाड, शांताराम ना. वारंग, सिताराम गो. उबारे, अनंत गावडे, दत्ताराम अ. लाड, विष्णऊ ल. लाड, आत्माराम सं. लाड, वासुदेव म. लाड, कृष्णा गो. लाड, कृष्णा गो. खांदारे, लवू गु. खांदारे, आत्माराम बा. लाड, सिताराम ल. लाड, सिताराम के. लाड, कृष्णा ज. लाड, कृष्णा ज. लाड, सुभाष अ. वारंग, आणि इतर ग्रामस्थ.
आपणास या पत्रकाद्वारे आव्हान करण्यात येते की मंडळाला सध्याचे सभासद हे वाडीच्या विकासाच्या बाबतीत पुरेसे नसून त्या करिता नवीन सुशिक्षित तरूण उमेदवारांनी सहभाग घेऊन वाडीतील इतर मतभेद बाजूला ठेवून वाडीच्या विकासासाठी एकत्रीत येणे जरूरीचे आहे. त्यासाठी आपण तरूणांनी मंडळाचे सभासद होऊन मातृभूमिला उपकृत मदत करावी हि विनंती.
दि. 181298 रोजी सिंधुदूर्ग जिल्हा विकास महामंडळ (मुंबई) या महामंडळाचे आपल्या मंडळाला सभासदत्व मिळालेले आहे.

गडनदींला बाधण्यात आलेल्या साकवा...

दि. 15-6-98 च्या मंडळाच्या पत्राप्रमाणे गोठणे गावच्या सरपंचानी साकवाच्या बाजूला असलेल्या वहाळीला पक्का साकव करुन दिला त्याचे श्रेय कै.सरपंच रामचंद्र बाईत यांना जाते. गडनदींला बाधण्यात आलेल्या साकवापासून आंबवणेवाडी पर्यंत 3 फूटाची पाऊलवाट सरपंचांना पाठविलेल्या पत्रावरून त्यांनी ती वाट पूर्ण केली.
स्मशान भूमिकडे जाण्यासाठी पक्का रस्ता व्हावा. स्मशान भूमिमध्ये शेड, मयत व्यक्तिला जाळण्यात येणारी लाकडे, सरळ राहण्यासाठी लोखंडी खांब, रस्त्यावर लाईटची सोय, गोठणे माळावर धरण या मागण्या 1985 पासूनच्या आहेत. त्यातील काही कामे पूर्ण झालेली आहेत. राहिलेली कामे ग्रामपंचायतीच्या विचारधीन आहेत.
नदीपलीकडे पावसाळी जाणे गैरसोयीचे होते म्हणून वारंवार प्रयत्न करून मा. आमदार श्री. आप्पा साहेब गोगटे यांनी गडनदीला पक्का साकव बांधून दिला. बांधल्यानंतर बरेच अडथळे आले त्याकरिता वेळोवेळी मंडळाने संबंधीत खात्याशी संपर्क साधून ते अडथळे दूर केले. आता त्या साकवाला रंग लावण्यात या हि मागणी केलेली आहे. साकव झाल्याकारणाने लोकांना, तुम्हा, आम्हाला, ग्रामस्थांना सहजतेने पावसाळी नदीपलीकडे जाता येते.

किर्लोस आंबवणेवाडी गावातील पाणीपुरवठा योजना..


पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत गाव तळी बांधणे व नवीन विहीरी बांधणे ही कामे थोडया फार प्रमाणात प्रगती पथावर आहेत.गावतळीला नळ योजना व्हावी म्हणून मा. आमदार श्री. आप्पा साहेब गोगटे आणि माननीय श्री. नारायणराव राणे यांना निवेदने देऊन आज गावाला तळी बांधून मिळाली त्याच तळीला आज नळ योजना झालेली आहे त्याकरिता सरकारी दरबारी अनेक प्रयत्न करावे लागले. वेळ प्रसंगी मंजूरी कमी असल्याने मंडळाने शिवाजी मंदिर आणि रविंद्र नाटय मंदिर येथे मदतीकरिता नाटकांचे प्रयोग केले आणि निधी उपलब्ध केला. नळ योजना व्हावी म्हणून श्री. गणेश संभाजी लाड यांनी पंप आणि पाईप बक्षिस रूपाने दिले काही ग्रामस्थांनी देणगी देवून हातभार लावला ग्रामस्थांनी श्रमदान केले 20501 रोजी नळाद्वारे ग्रामस्थांना पाणी मिळावयास लागले.

पावणादेवी भजन..

किर्लास आंबवणेवाडी स्थापना सन. 1983 साली....

इ.स.1983 साली आंबवणेवाडीतील इयत्ता 6वी पर्यंतच्या वर्गाची शासनाच्या आदेशावरून उठविण्याची जी कारवाई होत होती त्या वादग्रस्त प्रश्नावरून सर्व ग्रामस्थ एकत्रित येवून मंडळाची स्थापना केली त्यानंतर आंबवणेवाडीतील शाळा आंबवणेवाडीतच रहावी या बद्दल मंडळाने संबंधीत अधिकाऱ्याशी संबंध साधून प्रयत्न केले व शाळा आंबणेवाडीतच स्थिर केली. आज तीच शाळा इयत्ता 7वी पर्यंत उपलब्ध आहे. शाळेतील इ. 1ली ते 7 वी पर्यंतच्या पहिल्या 3 क्रमांकाच्या मुलाना दरवर्षी येणाऱ्या 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिनी) मंडळातर्फे बक्षिस देऊन त्यांचा गौरव केला जातो.

किर्लोस गाव

Thursday, July 10, 2008

श्री पावणादेवी सहकारी सोसायटीचे किराणा मालाचे दुकान

मंडळाच्या स्थापनेनंतर आपल्या गावात मंडळाची इमारत असावी या साठी मंडळाने सभासदांकडून निधी गोळा करून ग्रामस्थांनी श्रमदान करून आज मंडळाची इमारत गावात उपलब्ध करू ठेवली आहे. इमारतीसाठी लागणारी जमीन श्री सिताराम बुधाजी महाडीक यांनी उपलब्ध करून देवून मंडळाला बहुमोलाचो सहकार्य केले आहे. आज त्याच इमारतीमध्ये श्री पावणादेवी सहकारी सोसायटीचे किराणा मालाचे दुकान कार्यरत आहे. तसेच रॉकेलचा परवाना मंडळाने मिळविलेला आहे याचा फायदा ग्रामस्थांना होत आहे.

पावणादेवी मंदिर पूजा..

पावणादेवी मंदिर किर्लोस...





अध्यक्ष मनोगत..

॥ श्री रामेश्वर पावणादेवी प्रसन्न ॥
प्रिय ग्रामस्थ बंधू-भनिनी
आणि सभासद बंधू
श्री रामेश्वर पावणादेवी कृपाशीर्वादाने किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळाची स्थापना 1983 साली झाली असून आपल्या मंडळास 23 वर्षे पूर्ण होत आहेत. मंडळाचे माजी अध्यक्ष कै. कृष्णाजी बाळाजी लाड, उपाध्यक्ष कै. नारायण बाबाजी लाड, खजिनदार कै. शांताराम महादेव आंगणे, कै. रावजी गोविंद महाडिक आणि इतर सहकारी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली मंडळो आतापर्यंत गावातील विकासाची वाटचाल केली आहे. मंडळ स्थापनेचा मुख्य उद्देशच असा आहे की गावचा विकासाची कामे हाताळून आणि पाङ्गपुरावा चालूच आहे. गेली पाच वर्षे मुंबईमध्ये ग्रामस्थांचा सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रमंडळी असा कौटुंबिक मेळावा व सत्कारसमारंभ साजरा होत आहे. यावर्षीही कौटुंबिक मेळाव्याबरोबर एक स्मरणिका प्रकाशन सोहळा सादर करीत आहोत.
किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळाने यावर्षी पहिलीच स्मरणिका प्रसिध्द करण्याचे ङ्खरविले आहे माझ्या मनात थोडी चलविचल झाली. आतापर्यंत केलेल्या प्रत्येक कामात अडथळे आले आणि तसे ते येतातच! आणि सामाजिक कार्यात इतरांच्या बराबरीने पुढे जाताना कित्येकांचा शेषही सहन करावा लागतोच. अर्थात, हे वृत मी आचरणात आणल्यामुळे अशा अडथळयांना पार करण्यातच मला आनंद वाटतोच. त्यात तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मला नवीन उमेद मिळते व मी अधिक जोमाने हे कार्य करतो आहे. त्यात आता स्मरणिकेचे आणखी एक दिव्य पार करायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही. यासाङ्गी बराचसा निधी लागतो. सर्व सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही, अशी एक प्रचलित म्हण आहे. कोकण हा तसा विकासाच्या दृष्टीने मागेराहिलेला कारण कोकण कधीच सत्तेत नव्हता. गेल्या दहा वर्षात कोकणाने राज्याच्या राजकारणात सत्ताच नाही तर नेतृत्वही मिळवून दिले आणि विभागाची प्रगती व्हायला सुरुवात झाली.
आजवर ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाने अनेक योजना आखल्या आपल्यापरीने राबवल्याही, परंतु त्यांना हवे तसे यश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे गावातील लोकांच्या सक्रिय सहभागाने काही जिल्ह्यात युनिसेफच्या सहयोगातून 'गाव सहभागी सूक्ष्म नियोजन प्रकल्प' हा नवा प्रयोग राबवण्यात येत आहे. या प्रयोगाला आता उत्तम सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आपल्या गावच्या सेवामंडळाने विविध ग्रामोपयोगी प्रकल्प आणि यापुढेही ही सेवेची गंगा अविरत रहावी म्हणून गावातील सुशिक्षित तरुणांनी पुढे यावे.
महात्मा गांधी म्हणाले होते की, भारत हा खेडयांचा देश आहे आणि त्यांनी खेडयाकडे चला असा नारा दिला. आज गावातील मुले शिक्षण येऊन मोङ्गी होत आहेत ही आनंदाची बाब आहे. प्रत्यक्ष खेडयाकडे जाणे अशक्य आहे पण आपल्या गावातील विकासात आपण शहरात राहूनही हातभार लावावा तर मनाने खेडयाकडे गेलो असाच त्यातून अर्थबोध होईल असे मला वाटते.
आपली कर्मभूमी कोणतीही असेल पण आपली किंवा आपल्या पूर्वजांच्या जन्मभूमीकडे पाङ्ग फिरवून चालणार नाही. या मंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीत ज्या ज्येष्ठांचा सहभाग लाभला आणि माझ्या सोबत असणाऱ्या व खऱ्या अर्थाने किर्लोस आंबवणेवाडीच्या प्रगतीसाङ्गी तळमळणाऱ्या व या गावच्या विकासाचा रथ पुढे नेणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मला सहकार्य करणाऱ्या सर्वांना माझा मानाचा मुजरा!
श्री रामेश्वर-पावणादेवी चरणी मस्तक ठेवून, एवढीच विनंती करीन की, होऊन गेलेल्या आणि कार्यरत असलेल्या सर्व सभासदांनी तसेच कायमस्वरुपी नोकरी करणाऱ्या या गावातील रहिवाशांनी या मंडळास सभासद होऊन मंडळाची पुढील वाटचाल करावी. कौटुंबिक सोहळयास आणि स्मरणिकेच्या प्रकाशनास आर्थिक हातभार लावणाऱ्या देणगीदाराऱ्यांचे मनपूर्वक आभार !
धन्यवाद !!
आपला नम्र


रामचंद्र आपा लाड
(अध्यक्ष - किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळ)