॥ श्री रामेश्वर पावणादेवी प्रसन्न ॥
प्रिय ग्रामस्थ बंधू-भनिनी
आणि सभासद बंधू
श्री रामेश्वर पावणादेवी कृपाशीर्वादाने किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळाची स्थापना 1983 साली झाली असून आपल्या मंडळास 23 वर्षे पूर्ण होत आहेत. मंडळाचे माजी अध्यक्ष कै. कृष्णाजी बाळाजी लाड, उपाध्यक्ष कै. नारायण बाबाजी लाड, खजिनदार कै. शांताराम महादेव आंगणे, कै. रावजी गोविंद महाडिक आणि इतर सहकारी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली मंडळो आतापर्यंत गावातील विकासाची वाटचाल केली आहे. मंडळ स्थापनेचा मुख्य उद्देशच असा आहे की गावचा विकासाची कामे हाताळून आणि पाङ्गपुरावा चालूच आहे. गेली पाच वर्षे मुंबईमध्ये ग्रामस्थांचा सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रमंडळी असा कौटुंबिक मेळावा व सत्कारसमारंभ साजरा होत आहे. यावर्षीही कौटुंबिक मेळाव्याबरोबर एक स्मरणिका प्रकाशन सोहळा सादर करीत आहोत.
किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळाने यावर्षी पहिलीच स्मरणिका प्रसिध्द करण्याचे ङ्खरविले आहे माझ्या मनात थोडी चलविचल झाली. आतापर्यंत केलेल्या प्रत्येक कामात अडथळे आले आणि तसे ते येतातच! आणि सामाजिक कार्यात इतरांच्या बराबरीने पुढे जाताना कित्येकांचा शेषही सहन करावा लागतोच. अर्थात, हे वृत मी आचरणात आणल्यामुळे अशा अडथळयांना पार करण्यातच मला आनंद वाटतोच. त्यात तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मला नवीन उमेद मिळते व मी अधिक जोमाने हे कार्य करतो आहे. त्यात आता स्मरणिकेचे आणखी एक दिव्य पार करायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही. यासाङ्गी बराचसा निधी लागतो. सर्व सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही, अशी एक प्रचलित म्हण आहे. कोकण हा तसा विकासाच्या दृष्टीने मागेराहिलेला कारण कोकण कधीच सत्तेत नव्हता. गेल्या दहा वर्षात कोकणाने राज्याच्या राजकारणात सत्ताच नाही तर नेतृत्वही मिळवून दिले आणि विभागाची प्रगती व्हायला सुरुवात झाली.
आजवर ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाने अनेक योजना आखल्या आपल्यापरीने राबवल्याही, परंतु त्यांना हवे तसे यश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे गावातील लोकांच्या सक्रिय सहभागाने काही जिल्ह्यात युनिसेफच्या सहयोगातून 'गाव सहभागी सूक्ष्म नियोजन प्रकल्प' हा नवा प्रयोग राबवण्यात येत आहे. या प्रयोगाला आता उत्तम सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आपल्या गावच्या सेवामंडळाने विविध ग्रामोपयोगी प्रकल्प आणि यापुढेही ही सेवेची गंगा अविरत रहावी म्हणून गावातील सुशिक्षित तरुणांनी पुढे यावे.
महात्मा गांधी म्हणाले होते की, भारत हा खेडयांचा देश आहे आणि त्यांनी खेडयाकडे चला असा नारा दिला. आज गावातील मुले शिक्षण येऊन मोङ्गी होत आहेत ही आनंदाची बाब आहे. प्रत्यक्ष खेडयाकडे जाणे अशक्य आहे पण आपल्या गावातील विकासात आपण शहरात राहूनही हातभार लावावा तर मनाने खेडयाकडे गेलो असाच त्यातून अर्थबोध होईल असे मला वाटते.
आपली कर्मभूमी कोणतीही असेल पण आपली किंवा आपल्या पूर्वजांच्या जन्मभूमीकडे पाङ्ग फिरवून चालणार नाही. या मंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीत ज्या ज्येष्ठांचा सहभाग लाभला आणि माझ्या सोबत असणाऱ्या व खऱ्या अर्थाने किर्लोस आंबवणेवाडीच्या प्रगतीसाङ्गी तळमळणाऱ्या व या गावच्या विकासाचा रथ पुढे नेणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मला सहकार्य करणाऱ्या सर्वांना माझा मानाचा मुजरा!
श्री रामेश्वर-पावणादेवी चरणी मस्तक ठेवून, एवढीच विनंती करीन की, होऊन गेलेल्या आणि कार्यरत असलेल्या सर्व सभासदांनी तसेच कायमस्वरुपी नोकरी करणाऱ्या या गावातील रहिवाशांनी या मंडळास सभासद होऊन मंडळाची पुढील वाटचाल करावी. कौटुंबिक सोहळयास आणि स्मरणिकेच्या प्रकाशनास आर्थिक हातभार लावणाऱ्या देणगीदाराऱ्यांचे मनपूर्वक आभार !
धन्यवाद !!
आपला नम्र
रामचंद्र आपा लाड
(अध्यक्ष - किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळ)
Thursday, July 10, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

1 comment:
खुप छान कल्पना आहे. माझ्या कडुन आपणास मन:पुर्वक सुभेच्छा !!
Wings of will Group, Barshi
DreamIndia2020
Post a Comment