पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत गाव तळी बांधणे व नवीन विहीरी बांधणे ही कामे थोडया फार प्रमाणात प्रगती पथावर आहेत.गावतळीला नळ योजना व्हावी म्हणून मा. आमदार श्री. आप्पा साहेब गोगटे आणि माननीय श्री. नारायणराव राणे यांना निवेदने देऊन आज गावाला तळी बांधून मिळाली त्याच तळीला आज नळ योजना झालेली आहे त्याकरिता सरकारी दरबारी अनेक प्रयत्न करावे लागले. वेळ प्रसंगी मंजूरी कमी असल्याने मंडळाने शिवाजी मंदिर आणि रविंद्र नाटय मंदिर येथे मदतीकरिता नाटकांचे प्रयोग केले आणि निधी उपलब्ध केला. नळ योजना व्हावी म्हणून श्री. गणेश संभाजी लाड यांनी पंप आणि पाईप बक्षिस रूपाने दिले काही ग्रामस्थांनी देणगी देवून हातभार लावला ग्रामस्थांनी श्रमदान केले 20501 रोजी नळाद्वारे ग्रामस्थांना पाणी मिळावयास लागले.
Friday, July 11, 2008
किर्लोस आंबवणेवाडी गावातील पाणीपुरवठा योजना..
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment